यवतमाळ: नागपुर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशना वर धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी मेंढपाळ बांधवांनी काढलेल्या यवतमाळ ते नागपुर पायी मोर्चात आज वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा निरीक्षक शरदजी वसतकर यांच्या सूचनेवरून पक्षाच्या वतीने डॉ. निरजभाऊ वाघमारे, शहर अध्यक्ष कुंदन नगराळे, जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोळे आदी पदाधिकारी सहभागी झाले. यावेळी पदयात्रा मोर्चाचे आयोजक मेंढपाळ रक्षक वैजनाथ पावडे यांच्या सह हजारो समाज बांधवाच्या उपस्थित संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेची सुरुवात करत ही पदयात्रा नागपुर कडे रवाना झाली…



