

विद्यार्थ्यांतील खिलाडू वृत्ती वाढीस लागावी यासाठी डॉ. निरज वाघमारे यांच्यातर्फे दरवर्षी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येते.
सामान्य गोर-गरीब रुग्णांना दवाखान्यांपयंत जाण्यास गैरसोय होऊ नये याकरिता डॉ. निरज वाघमारे यांच्या तर्फे शहरात मोफत रुग्णवाहिका व आरोग्य दूतांची यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे. रग्णवाहिकेची सेवा हि रुग्णांना मोफत पुरविण्यात येते.


महिलांच्या आरोग्याची काळजी घेत डॉ. निरज वाघमारे यांनी यवतमाळ शहरातील महिलांसाठी स्वखर्चाने सॅनिटरी पॅड वाटपाचा उपक्रम हाती घेतला. आतापर्यंत जवळपास २,५०,००० सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले.
रस्त्याच्या कडेला छोटा मोठा धंदा लावून आपले उदरनिर्वाह करणार्यांना डॉ. निरज वाघमारे यांनी छत्रीचे वाटप केले.


मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिन्याच्या उपवास काळात मुस्लिम धर्मियांना डॉ. निरज वाघमारे यांच्या तर्फे खजूर व अल्पोहारचे वाटप केले.
“जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी..!”
नवनवे आत्मभान घेवुन सतत समाजाभिमुख राहणारे डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्या स्वखर्चातून काल दिनांक ०१ जानेवारी २०२३ रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या औचीत्याने शववाहीनी ( स्मृतीरथ) व रुग्णवाहिका या दोन्हीं सेवांचे आज लोकार्पण करण्यात आले.
