आज अश्विन पौर्णिमेला समाप्त होणाऱ्या वर्षवासाची नेताजी नगरातील चंद्रमणी बुद्ध विहारात समाप्ती व ग्रंथ वाचन समारोह पार पडला. या समाप्ती निमित्त बुद्ध विहार व आयोजकांच्या वतीने मला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले होते.
या समाप्ती व धम्म कार्याच्या प्रसंगी उपस्थित राहण्याचे सदभाग्य मला लाभले. नुकत्याच माझ्या वंचित बहुजन आघाडी पक्ष प्रवेशा मुळे उपस्थित दि. बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कार्यकारणी अध्यक्ष आयु. रविजी भगत, सरचिटणीस आयु. रुपेशजी वानखडे, आयु. भवरेजी, आयु. मोहोड सर, आयु. बनसोड सर, चंद्रमणी बौद्ध विहाराच्या अध्यक्षा आयु. रत्नमाला ताई ताकसांडे, आयु. करुणाताई भगत, आयु. कुसुमताई भवरे व अन्य यांनी माझे शाल व सुमनगुच्छ देऊन सत्कार करुन मला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वर्षावास समाप्तीच्या पावन पर्वावर मला प्रमुख अतिथी आमंत्रित करून माझा यथोचित सन्मान केल्या बद्दल भारतीय बौद्ध महासभा, दि. बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया व चंद्रमणी बुद्ध विहार समितीचे आभार व्यक्त केले..