दुर्गामातेच्या मूर्तीचे काल विसर्जन करण्यात आले. गेली दहा दिवस चाललेला हा मातेचा जागर काल पूर्ण झाला. हया दिवसात नगरात मातेचा दरबारात रोज नवनवीन कार्यक्रम, स्पर्धा आणि सामजिक उपक्रम मंडळाने राबविले. याला नगर वासियानी उस्फुर्त प्रतिसाद देत सामजिक एकतेचे, एकोप्याचे आणि बंधूतेचे दर्शन घडवून दिले. अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडलेला सोहळ्याची काल विसर्जनाने सांगता झाली. पारंपरिक पद्धतीने माता – भगिनी व नगर वासियांनी वेशभूषा साकारून, वाजत गाजत हर्शोल्लासात मातेला निरोप दिला. दहा दिवस भरभरून आनंद देणाऱ्या ह्या सोहळ्याने शेवटच्या क्षणी मात्र मन भरुन आले. परंतू परंपरेला अनुसरून विसर्जन सोहळ्या वेळी अखेर जड अंतकरणाने मातेला निरोप द्यावा लागला. या सोहळ्यातील काही क्षण…