यवतमाळ: नेताजी नगरातील चिमुकल्यांना हक्काचं खेळाच मैदान नसल्यामुळे या भागात असलेल्या एका पडीत मोकळ्या जागेत ( मैदानात) काल हे चिमुकले स्वतः विळे, फावडे घेऊन मैदानाची स्वच्छता करत होतें. ही बाब काही युवकांनी पाहिल्या नंतर त्यांना डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्याकडे जाऊन या स्वच्छतेची मागणी करण्याचा सल्ला दिला. त्यांनतर ही मुलं डॉ. निरजभाऊंच्या कार्यालयात येऊन हे मैदान आम्हास स्वच्छ करून द्या अस साकड घातलं. आलेल्या मुलांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत. निरजभाऊंनी ह्या मैदानाची पाहणी केली व तुम्हाला हे मैदान उदया सकाळीं खेळासाठी ऊपलब्ध करून देण्यासाठी आपण उदया पासुन कामाची सुरुवात करू असे सांगितले. व आज सकाळीं ह्या मैदानाची डॉ. निरजभाऊ वाघमारे यांनी स्वखर्चाने जेसीबी, ट्रॅक्टर व मजुराच्या साह्याने स्वच्छता करण्यास सुरुवात करण्यात आली….