यवतमाळ: नवनवे आत्मभान घेवुन सतत समाजाभिमुख राहणारे डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्या स्वखर्चातून काल दिनांक ०१ जानेवारी २०२३ रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या औचीत्याने शववाहीनी ( स्मृतीरथ) व रुग्णवाहिका या दोन्हीं सेवांचे आज लोकार्पण करण्यात आले. अचानक व अकस्मात उद्भवलेल्या आजारावेळी रुग्णाला रुग्णसेवा मिळावी म्हणून रुग्ण जलद गतीने रुग्णालयात पोहोचावा. तसेच अंत थांब्यावर मयतास पोहोचविण्यासाठी मृतकाच्या नातेवाईकांना साह्यभूत ठरणारी शववाहिनीची सेवा या दोन्हीं सेवांचे काल सायंकाळी डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्या जनसंपर्क कार्यालयावर मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले..
“जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी..!” आपल्या हक्काचा माणूस.. डॉ. निरजभाऊ वाघमारे….



