- छायाचित्र
- माहिती पुस्तिका
- वर्तमान पत्रातील बातम्या

डॉ. निरजभाऊ वाघमारे यांचा सत्कार
यवतमाळ शहरातील लोकप्रिय युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्या सामजिक कार्याची दखल घेत, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्व २०२२ अंतर्गत ६ डिसेंबर २०२२ रोजी आंबेडकरी साहित्य व कला अकादमी, महाराष्ट्र यांनी आझाद मैदानातील स्मृती पर्व कार्यक्रमांत डॉ. निरजभाऊ वाघमारे यांचा सत्कार करुन त्यांच्या कार्याचा गौरव केला..

आंदोलनाला अखेर यश मिळालं
नुसत्या तक्रारी करून फायदा नाही, नावात पण दम पाहिजे…
दिवाळी काळात खाजगी ट्रॅव्हल्स कडून प्रवाशांची होत असलेली आर्थिक लूट थांबवावी यासाठी डॉ. निरजभाऊ वाघमारे यांनी उभारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळालं. सण समारंभ काळात जादा दराने तिकिट आकारण्यात आलेल्या ट्रॅव्हल कंपन्यानवर यवतमाळ उपप्रादेशीक परिवहन विभागाकडून ३०५५००/- रुपयांचा आर्थिक दंड वसूल करण्यात आला…

डॉ. निरजभाऊ वाघमारे व बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर
नुकत्याच पार पडलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्या निमित्त यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर असलेले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेतील बाळासाहेब आणि डॉ. निरजभाऊ वाघमारे यांचा एकत्रित फोटो. एका चाहत्याने टिपून तो तैलचित्रा व्दारे असा डॉ. निरजभाऊ वाघमारे यांना भेट दिला.

डॉ. निरजभाऊ वाघमारे
नजूल विभागाकडून लिजपट्ट्याला ग्रीन सिग्नल… डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्या तर्फे नेताजी नगर वसियांच्या लिजपट्ट्यासाठी चालू असलेल्या लढ्यात प्रशासनाकडून युद्ध पातळीवर कार्य चालू आहे. विद्यमान तहसिलदार, यवतमाळ यांनी नजुल विभागाला मागितलेल्या अहवालात नेताजी नगरवासियांच्या लिजपट्टे प्रकरणात नाहरकत दर्शवून या प्रकरणात नजुल विभागाकडून ग्रीन सिग्नल दाखविला आहे…..

लिजपट्ट्याचा पहिला टप्पा यशस्वी पूर्ण
नेताजी नगर ( यवतमाळ) : डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्या अथक परिश्रमाने आणि अखंडित पाठपुराव्याने लिज पट्ट्याचा चालू असलेला लढा यशस्वी झाला. नेताजी नगर वासियांच्या अतिक्रमित जागांची भूमि अभिलेख विभागाकडून झालेली मोजणीची शीट आज प्राप्त झाली. या नकाशाची प्रत डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्या कार्यालया समोर फटक्याच्या आतिषबाजीत आणि नगरवासियांच्या उपस्थित जल्लोषात प्रकाशित करण्यात आली. व सदर प्रत डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्या कार्यालयात लावण्यात आली. दिवाळीच्या पूर्व संध्येला नेताजी नगर वसियांना मिळालेली ही आनंदाची बातमी दिवाळी सणाच्या उत्साहात अधिक भर घालणारी ठरली

जश्ने ईद - मिलादुन्नबी
जश्ने ईद – मिलादुन्नबी निमित्त आज नेताजी नगरातील माझ्या मुस्लिम बांधवांनी रॅलीचे आयोजन केले होते. नेताजी नगर ते कळंब चौक निघणाऱ्या ह्या रॅलीत माझ्या मुस्लिम बांधवांनी मला आमंत्रित केले होते. या रॅलीत सहभागी होऊन जश्ने ईद – मिलादुन्नबी निमित्त समाज बांधवांना शुभेच्छा देऊन त्यांच्या आनंदात सहभागी झालो…

भव्य जगराता
नेताजी नगर (यवतमाळ) : नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने डॉ. निरजभाऊ वाघमारे मित्र परिवार आयोजित सुप्रसिद्ध गायक जितूभाऊ पाखरे यांचा भव्य जगराता कार्यक्रम काल पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तहसिलदार कुणाल झाल्टे व शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार नंदकुमार पंत, विदर्भ सोनार समाजाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे व डॉ. निरजभाऊ वाघमारे उपस्थित होते.

नवनियुक्त मुख्याधिकारी थेट डॉ.निरजभाऊंच्या कार्यालयांत..
यवतमाळ नगरपरिषदेत वादग्रस्त ठरलेल्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची तात्काळ बदली झाल्यानंतर नवनियुक्त मुख्याधिकारी श्री.
दादाराव डोल्हारकर यांनी नगरपरिषदेचा पदभार स्वीकारल्यानंतर आज यवतमाळ येथे डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. निरजभाऊ वाघमारे यांची सदिच्छा भेट घेतली. श्री. डोल्हारकर यांनी कार्यालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. निरजभाऊंनी शाल – श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

नवनियुक्त मुख्याधिकारी थेट डॉ.निरजभाऊंच्या कार्यालयांत..
यवतमाळ नगरपरिषदेत वादग्रस्त ठरलेल्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची तात्काळ बदली झाल्यानंतर नवनियुक्त मुख्याधिकारी श्री.
दादाराव डोल्हारकर यांनी नगरपरिषदेचा पदभार स्वीकारल्यानंतर आज यवतमाळ येथे डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. निरजभाऊ वाघमारे यांची सदिच्छा भेट घेतली. श्री. डोल्हारकर यांनी कार्यालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. निरजभाऊंनी शाल – श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. शहरातील प्राथमिक सोयीसुविधा व बहुचर्चित असलेल्या समस्यांना घेऊन यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

विदर्भ आयडॉल पुरस्कार स्वीकारताना
डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत महाराष्ट्र राज्याचे वन तथा सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, नाम फाउंडेशनचे संस्थापक – मराठी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, अनाथांचा नाथ डॉ. शंकरबाबा पापळलकर यांच्या हस्ते डॉ. निरजभाऊ वाघमारे “विदर्भ आयडॉल” हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण आज नागपूर येथील पंचतारांकित ली मेरिडियन या हॉटेल मध्ये पार पडले.

मतदान कार्ड - आधार कार्डशी लिंक करने
आपले मतदान कार्ड – आधार कार्डशी लिंक करने शासनाने बंधनकारक केले आहे. तरी प्रभाग क्रमांक १० मधील नेताजी नगर, वैशाली नगर, माधव नगर, संभाजी नगर, पळसवाडी कॅम्प, व जवळील परिसरातील मतदारांचे आधार – मतदान कार्ड जोडणी करण्यासाठी शिबिराचे डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्या कार्यालयावर चालू करण्यात आली आहे. सकाळी दहा वाजता या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तरी सर्व मतदारांना विनंती करण्यात येते की आपण आपले आधार कार्ड व मतदान कार्ड घेऊन या ठिकाणी आधार जोडणी करून घ्यावी…

नवीन जबाबदारी
वंचीत बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने, प्रदेशाध्यक्ष श्री. निलेशजी विश्वकर्मा यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ जिल्ह्यातील युवा नेते डॉ. निरजभाऊ वाघमारे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या “राज्य कार्यकारणीत सदस्य” म्हणून निवड करण्यात आली. सोबत विदर्भातील नागपूर – वर्धा व चंद्रपूर या जिल्ह्याची “जिल्हा निरीक्षक” म्हणून जबाबदारी देण्यात आली. बहुजन समाजातील बंधूंना – भगिनीं आणि मातांना अभिमान वाटावा असे कार्य डॉ. निरजभाऊंच्या हातून घडो या सदीच्छेसह प्रदेशाध्यक्ष श्री. निलेशजी विश्वकर्मा यांनी डॉ. निरजभाऊंचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या….

साखरेची तुला
डॉ. नीरज वाघमारे यांचे यवतमाळ शहरासह जिल्हाभरात अनेक चाहते असून त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे गतवर्षी झालेल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम व अन्य उपक्रमांचे आयोजन त्यांच्या चाहत्यांनी केले होते यामध्ये मुख्यतः साखर तुला करून या साखरेचे गोरगरीब जनतेत वाटप करण्यात आले होते.