अखेर भिम जयंतीची रॅली निघाली……


राळेगाव तालुक्यातील खैरी येथे सन २००१ पासुन भीम जयंती उत्सवाच्या रॅलीला काही कारणास्तव प्रशासनाने निर्बंध घातले होते. तेव्हा पासुन आजवर येथील रॅलीची परंपरा बंद असल्याने सदर रॅली वरील निर्बंध उठवून भीम जयंती ची रॅली चालू व्हावी यासाठी येथील समाज बांधवांनी पोलिस स्टेशन वडकी येथे दिनांक १२ एप्रिल २०२३ पासुन आमरण उपोषण चालू केले व ही बाब डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्या निदर्शनास आणून दिली व याप्रकरणात सहकार्य करून रॅली करीता प्रशासनाकडून परवानगी मिळवून द्यावी अशी विनंती केली. उपोषणकर्त्या समाजबांधवांना तात्काळ प्रतिसाद देत डॉ. निरजभाऊ वाघमारे यांनी दिनांक १३ एप्रिल रोजी उपोषणकर्त्याना भेट दिली. सदर प्रकरणात संबधीत असलेले पोलिस उपविभागीय अधिकारी संजयजी पुज्जलवार व वडकी येथील ठाणेदार महाले यांच्याशी संवाद साधून सदर समस्या मार्गी लावली. येथील रॅलीला परवानगी मिळवून दिली. रॅलीसाठी प्रशासनाने दिलेल्या ग्रीन सिग्नल मुळे येथिल रॅली व जयंती महोत्सव उत्साहात पार पडला. गेले कित्येक वर्ष बंद असलेल्या रॅलीला पोलीस प्रशासनाने परवानगी देऊन सहकार्य केल्याबद्दल डॉ.निरजभाऊ वाघमारे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संजयजी पुज्जलवार यांची आज भेट घेऊन त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *